Articles liés à Samarthshishya Tapsvini Venaswami

Samarthshishya Tapsvini Venaswami - Couverture souple

Rajlaxmi Nitin Deshpande

 
9789347138287: Samarthshishya Tapsvini Venaswami

Synopsis

बालविधवा झाल्यानंतर ग्रंथवाचनाने तापसी झालेल्या वेणाबाईंच्या आयुष्यात समर्थ सद्गुरू म्हणून आले आणि त्यांचा कायापालट झाला. नाजूक चणीच्या वेणाबाई समर्थांच्या आज्ञेने कालांतराने ग्रंथकर्त्या झाल्या.मिरजेच्या मठाधिपती झाल्या. त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. समर्थांचे कार्य त्या अधिकाराने पुढे नेऊ लागल्या... हे सारे अचंबित करणारे आहे. समाजाचा रोष पत्करून एखादी स्त्री वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिक क्षेत्रातील किती मोठी उंची गाठू शकते, याचा वेणास्वामी आदर्श आहेत. म्हणूनच त्यांचे हे चरित्र आजच्या काळातही प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित!

Les informations fournies dans la section « Synopsis » peuvent faire référence à une autre édition de ce titre.

À propos de l'auteur

मूळ कवी प्रवृत्तीच्या असलेल्या राजलक्ष्मी देशपांडे यांना बालवयापासून अनेक संतसज्जन आणि विद्वानांना प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. हा वारसा त्यांनी जपला व वाढवला. भाविकता आणि अभ्यासपूर्ण चिंतन यांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला दिसतो. अनेक संतचरित्रांचे लेखन त्यांनी अभ्यासपूर्ण शैलीत केले आहे. सकाळ प्रकाशनातर्फे त्यांची योगियांचा राणा, ब्रह्मचैतन्य ही संतचरित्रे आणि शिर्डीचे साईबाबा हा अनुवादपर ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यांचे कवितासंग्रह व लेखसंग्रहही प्रकाशित झाले आहेत.

Les informations fournies dans la section « A propos du livre » peuvent faire référence à une autre édition de ce titre.